Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मॉस्को हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यावर हल्ला; हत्येचा कट की अपघात?

मॉस्को हादरलं! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यावर हल्ला; हत्येचा कट की अपघात?


मॉस्को: एक खळबळजनक घटना समोर आली आहे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ताफ्यातील एका कारचा स्फोट झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मॉस्कोतील गुप्तचर संस्था FSB च्या मुख्यालयाबाहेर हा हल्ला झाला.

एका अलिशान लिमोझिन कारवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे कारच्या इंजिनला आग लागली आणि ती प्रचंड वेगाने पसरली आहे. अद्याप राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या हत्येचा कट होता की, अपघात हे स्पष्ट झालेले नाही.

सध्या या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत चिंता वाढली आहे. यापूर्वी 26 मार्च रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केलेल्या पुतिन यांच्या मृत्यूच्या दाव्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. यामुळे हा हल्ला जाणून बुजून केला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही गटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. सध्या रशियन सुरक्षा यंत्रणेने या घटनेचा सखोल तपास सुरु केला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्कीर यांनी पॅरिसमध्ये एका मुलाखती दरम्यान म्हटले होते की, पुतिन लवकरच मरतील आणि ही वस्तुस्थिती आहे. यानं सगळं संपेल". तसेच पुतिन आयुष्भर सत्तेत राहू इच्छितता, त्यांच्या महत्त्वाकांक्षा केवळ युक्रेनपुरत्या मर्यादित नसून पाश्चात्य देशांशीही संघर्ष होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अंदाज बांधण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पुतिन कर्करोग आणि पार्किन्सन सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त आहेत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला पुतिन यांच्या हत्येचा कट आहे. मात्र हा हल्ला कोणी केला याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. हा हल्ला पुतिन यांच्यावर दबाव आणण्यासाठी आणि रशियन सत्तेवर हल्ला करण्यासाठी करण्यात आला आहे. हे एक धोरणात्मक पाऊल असू शकते. दरम्यान या हल्ल्यात कोणती जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

सध्या रशियाने राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या आजारपणाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, झेलेन्स्की यांचे विधान यूक्रेन रशियाला कमकुवत करण्यासाठी आहे. मात्र युक्रेनची पुढील रणनीती काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.