Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरच्या पूत्राला सीमेवर वीरमरण, सैन्याच्या वाहनातून निघाला, पण भयानक घडलं

कोल्हापूरच्या पूत्राला सीमेवर वीरमरण, सैन्याच्या वाहनातून निघाला, पण भयानक घडलं


कोल्हापूर : भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण आलं आहे. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवान शहीद झाला आहे.

सुनिल विठ्ठल गुजर असं शहीद झालेल्या जवानाचं नाव असून तो 27 वर्षांचा होता. 2019 साली सुनिल विठ्ठल गुजर भारतीय सैन्य दलात भरती झाले होते.

सुनिल गुजर यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर ते मणीपूर येथे 110 बॉम्बे इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये सेवा बजवत होते. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचे वाहन 800 फूट खोल दरीमध्ये कोसळले आणि अपघात झाला. या अपघातामध्ये सुनिल गुजर यांचा मृत्यू झाला. सुनिल गुजर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि सहा महिन्यांचा मुलगा तसंच भाऊ असा परिवार आहे.

मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना घेऊन जाणारे वाहन दरीमध्ये कोसळले. या अपघातामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला, तर 13 जवान जखमी झाले. या अपघातामध्ये दोन जवान जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

दरम्यान मणिपूरच्या राज्यपालांनी या अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे. 'सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग गावात झालेल्या अपघाताबाबत मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बीएसएफच्या तीन जवानांना आपला जीव गमवावा लागला. पीडित कुटुंबाचं सांत्वन, तसंच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना', अशी पोस्ट राज्यपाल कार्यालयाने केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.