सांगलीतील स्टेशन चौकात आंदोलक आले अन्.... अश्रुधुराचा केला मारा; दंगल पांगवण्याचे प्रात्यक्षिक यशस्वी
सांगली : वेळ सायंकाळी सहाची... गजबजलेल्या स्टेशन चौकात अचानक आंदोलक आले. आमच्या मागण्या मान्य करा, कांद्याला हमीभाव द्या, अशा मागण्या करत परिसर दणाणून सोडला. तेवढण्यात एकाने जाळपोळ सुरू केली आणि दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. क्षणात पोलिसांना माहिती मिळाली.
जलदकृती दलासह शहर, संजयनगर, विश्रामबाग, ग्रामीण पोलिसांचे पथक दाखल झाले.
हातात लाठ्या काठ्या घेवून दंगलीवर नियंत्रणाचा प्रयत्न झाला. परंतू दंगल
उसळली. अखेर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी अश्रुधुराचा मारा करण्याचे
आदेश देताच मोठा आवाज परिसरात झाला... तरीही घोषणाबाजू सुरूच राहिले अखेर
ग्रेनाईड फेकताच दंगेखोर पळून गेले, काहींना पोलिसांनी ताब्यात आणि मॉक
ड्रिल यशस्वी झाले.
आगामी सण, उत्सव, जयंतीच्या
पार्श्वभूमीवर सांगली पोलिस दलाकडून मॉक ड्रिल करण्यात आले. शहर,
विश्रामबाग, संजयनगर, ग्रामीण आणि वाहतूक शाखेचे पोलिस उपस्थित होते. पोलिस
अधीक्षक संदीप घुगे यांनी पथकाला सूचना दिल्या. तसेच मॉकड्रील यशस्वी
करताच पथकाने अधीक्षकांना माहिती दिली. त्यानंतर शस्त्रधारी, लाठीधारी
पोलिसांनी स्टेशन चौकातून संचलनास सुरूवात केली. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने
संचलन झाले. प्रारंभी अधीक्षक घुगे, सहायक अधीक्षक (शहर उपाधीक्षक) विमला
एम., शहरचे निरीक्षक संजय मोरे, विश्रामबागचे सुधीर भालेराव, संजयनगरचे
सुरज बिजली, ग्रामीणचे किरण चौगुले, वाहतूक शाखेचे मुकुंद कुलकर्णी यांची
उपस्थिती होती.
आगामी सण उत्सव शांततेत आणि पारंपारीत पद्धतीने साजरे करा, असे आवाहन अधीक्षक घुगे यांनी केले आहे. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच समाजमाध्यमांवर तेढ निर्माण होईल, असा पोस्ट शेअर करून नका, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.