Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हिंदीत बोला...' साताऱ्यातच मराठीचे हाल, बँक कर्मचाऱ्याचा उर्मटपणा

'हिंदीत बोला...' साताऱ्यातच मराठीचे हाल, बँक कर्मचाऱ्याचा उर्मटपणा
 

सातारा: मागील काही महिन्यांपासून मराठी भाषा आणि मराठी माणसाचे मानसिक खच्चीकरण सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या परिसरात बिगर मराठी भाषिकांकडून मराठी भाषेची आणि मराठी माणसाची अवहेलना होत असताना आता साताऱ्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बँकेतील अधिकाऱ्याने मराठी भाषिक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना हिंदी शिकून या असे म्हणत उर्मटपणा दाखवला आहे. या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला जात असल्याचे समोर आले आहे. मराठी एकीकरण समितीने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.
व्हिडीओतील राहुल शेडगे या तरुणाने केलेल्या दाव्यानुसार, या बँक ऑफ महाराष्ट्रच्या पाटण शाखेत बहुंताश ग्राहक हे ज्येष्ठ नागरीक आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना हिंदी भाषा येत नाही. त्यांना मराठी भाषा बोलता येते आणि समजते. पण या बँकेतील कर्मचारी या मराठी भाषिक ग्राहकांना हिंदीतच बोलण्याचा हट्टाहास करतात. आम्हाला मराठी भाषा येत नसल्याने हिंदीत संभाषण करण्याची सूचना या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते.
 
आम्हाला तुमची गरज नाही, हिंदी शिका...
राहुल शेडगे यांनी बँकेतून व्हिडीओ शूट केला असून धक्कादायक आरोप केले आहेत. राहुल शेडगे यांनी सांगितले की, हिंदीच्या हट्टहासाबाबत जाब विचारले असता त्याने तुम्ही हिंदी शिकून या, आम्हाला तुमची गरज नाही असं उलट उत्तर दिले. या व्हिडीओवर सोशल मीडियातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.