वृद्धांची एटीएममध्ये हातचलाखीने फसवणूक करणाऱ्या इंदापूरच्या एकाला अटक रोकड, दुचाकी जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली :- एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धांची हातचलाखीने कार्ड बदलून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या इंदापूर येथील एकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोकड, दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अमोल भगवान शेंडे (वय ३५, रा. यादव वस्ती, काठी, ता इंदापूर, जि पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फेब्रुवारीमध्ये तासगाव येथे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी दिलीप देवमाने गेले होते. त्यावेळी एकाने पैसे काढण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने कार्डची अदला बदल करून त्यांच्या खात्यातील पैसे काढले होते. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. यातील चोरट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. पथक त्याचा शोध घेत होते.
त्यावेळी पथकातील सागर लवटे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार शेंडे याने हा गुन्हा केल्याची तसेच तो विना क्रमांकाची दुचाकी घेऊन यशवंतनगर चौकात थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने तासगाव आणि वडूज येथील गुन्ह्यांची कबुली दिली. त्याला अटक करून तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सागर लवटे, महादेव नागणे, संदिप गुरव, सतिश माने, मछिंद्र बर्डे, अनिल कोळेकर, अमर नरळे, नागेश खरात, संदिप नलावडे, उदय माळी, विक्रम खोत, केरूबा चव्हाण, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.