Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तामिळनाडूने रुपयाचं चिन्हच बदललं; पाहा कसं आहे तमिळ भाषेतील चिन्ह

तामिळनाडूने रुपयाचं चिन्हच बदललं; पाहा कसं आहे तमिळ भाषेतील चिन्ह
 

तामिळनाडू आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाषेच्या मुद्द्यावर वाद पेटला आहे. दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू सरकारने राज्याच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये रुपया चिन्हाऐवजी (₹) तमिळ भाषेतील रुबई (तमिळमध्ये रुपये) मधील पहिले अक्षर 'रु' वापरण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मार्च म्हणजे उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, त्याचा टीझर एमके स्टॅलिन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये, "समाजातील सर्व घटकांना लाभ मिळाला यासाठी आणि तमिळनाडूचा व्यापक विकास करण्यासाठी…". या टिझरमध्ये सुरुवातीला रुपयाचे बदलेले चिन्ह पाहायला मिळत आहे.'द्रविडियन मॉडेल' आणि 'TNBudget2025' हे हॅशटॅग देखील या पोस्टमध्ये वापरण्यात आले आहेत.

मागील दोन अर्थसंकल्पांमध्ये लोगोमध्ये रुपयाच्या चिन्हाचा वापर करण्यात आला होता. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावेळी देखील रुपयाचे चिन्ह (₹) वापरण्यात आलं होतं. मात्र यावेळी तमिळ भाषेला प्राधान्य देण्यात आलं आहे. दरम्यान एखाद्या राज्याने राष्ट्रीय चलनाचे चिन्ह वापरण्यास नकार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. एनईपी आणि तीन भाषीक सूत्राला तमिळनाडू सरकार विरोध करत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

भाजपाचे तमिळनाडूचे भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी रुपयाचे चिन्ह बदलण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "डीएमके सरकारचा राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये तमिळ व्यक्तीने बनवलेले रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले, जे की संपूर्ण भारताने स्वीकारले आणि आपल्या चलनात समाविष्ट केले." तसेच या चिन्हाची रचना करणारे उदय कुमार हे डीएमकेच्या माजी आमदाराचे पुत्र असल्याची बाबा नमूद करत अन्नामलाई यांनी विचारले, "एमके स्टॅलिन तुम्ही आणखी किती मूर्ख होणार?" अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी देखील स्टॅलिन यांच्यावर टीका केली आहे. "उदय कुमार धर्मलिंगम हे एक भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि डिझायनर आहेत, जे द्रमुकच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत, ज्यांनी भारतीय रुपयाचे (₹) चिन्ह डिझाइन केले होते, जे भारताने स्वीकारले होते. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन तमिळनाडूच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून ₹ चिन्ह वगळून तमिळ लोकांचा अपमान करत आहेत. एखादी गोष्ट किती हास्यास्पद होऊ शकते?"

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.