Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले पोलिस, गावकऱ्यांचा पथकावरच हल्ला; अधिकाऱ्याचा मृत्यू, गुन्हेगाराने...

मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले पोलिस, गावकऱ्यांचा पथकावरच हल्ला; अधिकाऱ्याचा मृत्यू, गुन्हेगाराने...
 

मोस्ट वान्टेड गुन्हेगारा पकडण्यासाठी गेले असता गावकऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला केला यात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे घटना घडली आहे.

अररियामध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये फुलकाहा पोलीस ठाण्यात तैनात एएसआय राजीव रंजन पोलीस पथकासह फुलकाहा मार्केटमध्ये छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यांचा गावकऱ्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मात्र वॉन्टेड गुन्हेगार मात्र फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. ललितकुमार यादव, प्रभूकुमार यादव, प्रमोदकुमार यादव, शंभू यादव, कुंदन यादव आणि लालन यादव अशी अटक आरोपींची नावे आहेत.

मोस्ट वाँटेड गुन्हेगार अनमोल यादव फुलकाहा मार्केटमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीसांनी सापळा रचला. फुलकाहा पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीच छापा टाकण्यासाठी फुलकाहा मार्केटमध्ये पोहोचले. पोलिसांनी अनमोल यादवला पकडले होते. मात्र, काही पोलिसांवर हल्ला करून गुन्हेगाराची सुटका करण्यात आली. यावेळी राजीव रंजन पडले. त्याला रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

एएसआय राजीव रंजन मल ( वय 45) एएसआय राजीव रंजन मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब पाटणा येथे राहते. त्यांचे वडील अनिलकुमार मल हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांचे वडिलोपार्जित घर मुंगेरमधील नया रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जानकीनगर गावातील कुशवाह टोला प्रभाग 4 मध्ये आहे. सध्या राजीव रंजनचा विवाह 2001 मध्ये सुंदरपूर गावातील रुबी देवीसोबत झाला होता. त्यांना राणी रंजन आणि राणू रंजन या दोन मुली आहेत.

राजीव रंजन यांचे मित्र पवन कुमार सिंह यांनी सांगितले की, मी त्यांच्याशी पाच दिवसांपूर्वी बोललो होतो. आम्ही त्यांना होळीच्या दिवशी घरी यायला सांगितले होते. मात्र त्यांनी कर्तव्याला प्राधान्य देत घरी येण्यास नकार दिला. होळीनंतर घरी येणार असे सांगितले होते. होळीनंतर आपण सर्व मित्र एकत्र येऊन ती साजरी करू, असे वचन त्यांनी दिले होते. पण ती इच्छा आता कायमची अपूर्णच राहिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.