Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :-लग्नाचे आमिष दाखवून एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक:,संशयित कोल्हापूरचा

सांगली :- लग्नाचे आमिष दाखवून एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेची फसवणूक:,संशयित कोल्हापूरचा
 
 
सांगली :  एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेस लग्नाचे आमिष दाखवून रोख ७ लाख रुपये, सोन्याची अंगठी, डायमंड रिंग काढून घेतली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळही केली. तसेच मोबाइलमधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देत ४० लाख रुपये आणि चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागितली. याबाबत पीडितेने संशयित योगेश वसंत पाटील (रा. ५०७ सी वार्ड, करवीर वाचनालयाजवळ, भवानी मंडप, कोल्हापूर) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,  विश्रामबाग परिसरातील पीडित महिला आणि संशयित योगेश पाटील यांची गतवर्षी जुलै महिन्यात ओळख झाली. योगेश पाटील याने त्याच्या पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याची कागदपत्रे पीडित महिलेस दाखवली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेकडून ७ लाख रुपये रोख घेतले. हातातील सोन्याची अंगठी, कानातील डायमंड रिंग घेऊन ते परत न देता फसवणूक केली. याबाबत विचारणा केल्यानंतर योगेश याने पीडित महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळही केली. पीडित महिलेच्या मोबाइलमधील डाटा प्रसारित करण्याची धमकी देऊन ४० लाख रुपये व चार सोन्याच्या बिस्किटांची खंडणी मागणी केली.
६ जुलै २०२४ ते ५ मार्च २०२५ दरम्यान हा प्रकार विश्रामबाग परिसरात घडल्याची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे. त्यानुसार योगेश पाटील याच्यावर ॲट्रॉसिटी आणि बीएनएस ३१८ (४), ३१६ (२), ३०८ (२), ११५ (२), ३५१ (२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. संशयित योगेश पाटील याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बीएनएस ३०३ (२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.