Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नितेश राणेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार? छावा मराठा महासंघ आक्रमक

नितेश राणेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार? छावा मराठा महासंघ आक्रमक
 

राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. छावा मराठा युवा महासंघाने त्यांच्याविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे लेखी तक्रार दिली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

संविधानिक पदावर असताना राणे सतत समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहेत, असा आरोप महासंघाने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते, असा वादग्रस्त जावईशोध लावून त्यांनी दोन समाजांत फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महासंघाने लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 नुसार गुन्हा दाखल करण्याची आणि मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.