Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येसाठी अघोरी विद्येचा प्रयोग, उशीखाली सुई टोचलेली बाहुली; पत्नीला अटक

उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येसाठी अघोरी विद्येचा प्रयोग, उशीखाली सुई टोचलेली बाहुली; पत्नीला अटक


छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपला उपजिल्हाधिकारी पतीला ठार मारण्याचा कट रचल्याची माहिती आहे. देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकाऱ्याचं नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यांची पत्नी सारिका कटके हिने पतीला मारण्यासाठी विषप्रयोग आणि अघोरी विद्येचा वापर केल्याची माहिती आहे. पत्नीच्या मित्राने केंब्रिज चौकात पिस्तूल रोखले, असा आरोप देखील केला आहे. तर कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी, तिचा मित्रासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवेंद्र कटके यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2000 मध्ये त्यांनी सारिका हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुलंही आहेत. लग्नाच्या काही दिवसात सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा तगादा लावला होता. मात्र, अनुसूचित जातीत आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे लाभ बंद केल्याच्या शासन निर्णयानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच सारिकाच्या वागणुकीत बदल झाला.

जीपीएस यंत्रणेमुळे झाला खुलासा...
कटके यांनी आपल्या कारला सुरक्षेच्या कारणास्तव जीपीएस यंत्रणा बसवली आहे. ही स्कोडा कार त्यांची पत्नी वापरते. ३ मार्च रोजी ही कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचं लक्षात येताच कटके यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. ती कार केंब्रिज चौकात उभी होती. त्याच्या शेजारी आरोपी विनोद उबाळे यांची कार होती. विनोद उबाळे हा सारिका ज्या शाळेचा कारभार सांभाळते त्याच्या जवळील एका हॉटेलचा मालक आहे. उबाळे आणि सारिका हे एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. येथे उबाळेने देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखले. त्यांच्याविरोधात जातीवाचक शब्द वापरण्यात आल्याचा कटकेंचा आरोप आहे.

सारिकाने आई, विनोद उबाळे याच्या मदतीने कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. घरात कटके यांच्या गादीखाली काळं झालेलं लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळल्याचंही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.