Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिका प्रभारी आयुक्त पदावरून पाठशिवणीचा खेळ:,आयुक्त पदावर कोणाची वर्णी लागणार

सांगली महापालिका प्रभारी आयुक्त पदावरून पाठशिवणीचा खेळ:, आयुक्त पदावर कोणाची वर्णी लागणार
 

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपूरला बदली आहे. या रिक्त पदावर प्रभारी आयुक्त पदावर दोन अधिकाऱ्यांमध्ये पाठशिवणीचा खेळ शुक्रवारी पाहिला मिळाला. शुक्रवारी प्रभारी आयुक्त म्हणून नीलेश देशमुख यांचा आदेश शासनाकडून आला होता. त्यांनी सकाळी महापालिकेचा अर्थसंकल्पही सादर केला. सायंकाळी प्रभारी आयुक्त म्हणून रवींद्र अडसूळ यांच्या नावाचा आदेश महापालिकेत आला. त्यानंतर त्यांनी पदभारही स्वीकारला.

आयुक्त शुभम गुप्ता यांच्याविरोधात त्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्याही तक्रारी होत्या. या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव या पदावर नियुक्ती केली आहे. त्यानंतर आयुक्त पद रिक्त राहिले आहे. सेवाज्येष्ठतेनुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र अडसूळ यांना प्रभारी आयुक्त म्हणून संधी मिळणे गरजेचे होते. 
 
पण, अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांना महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून संधी मिळाली होती. यावरून महापालिका क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली होती. सकाळी महापालिकेचा अर्थसंकल्पही प्रभारी आयुक्त नीलेश देशमुख यांनी सादर केला होता. त्यानंतर शासनाकडे वेगवान घडामोडी घडल्यानंतर सायंकाळी रवींद्र अडसूळ यांची प्रभारी आयुक्त म्हणून वर्णी लागली.
महापालिका आयुक्त पदावर वर्णी कुणाची?

गुप्ता यांच्या बदलीनंतर आता महापालिकेचे नवीन आयुक्त कोण असणार, याकडे लक्ष लागले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, भालचंद्र गोसावी तसेच वैद्य या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. या तीन अधिकाऱ्यांशिवाय वेगळेच नावही आयुक्तपदासाठी पुढे येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. एका महिला आयएएस अधिकारी यांचेही नाव चर्चेत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.