Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली आगारसाठी बीएस-6 च्या अद्यावत आधुनिक सेवायुक्त 5 बसेस सांगली आगारात लोकार्पण सोहळा संपन्न...सांगली विभागाला आणखीन 200 बसेस मिळावेत याबाबत परिवहन मंत्री यांच्याकडे मागणी.. आमदार सुधीरदादा गाडगीळ

सांगली आगारसाठी बीएस-6 च्या अद्यावत आधुनिक सेवायुक्त 5 बसेस सांगली आगारात लोकार्पण सोहळा संपन्न... सांगली विभागाला आणखीन 200 बसेस मिळावेत याबाबत परिवहन मंत्री यांच्याकडे मागणी.. आमदार सुधीरदादा गाडगीळ
 

सांगली १५ मार्च २०२४ :- सांगली जिल्ह्यातील आठ डेपोमध्ये व मिळून 700 च्या आसपास बसेस आहेत. यातील 200 बसेस यावर्षी निकामी होत आहेत. त्यामुळे सांगली विभागाला आणखीन 200 बसेस मिळावेत अशी मागणी एसटी विभागाकडून करण्यात आली आहे. याबाबत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा सुद्धा केला होता. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली आगारसाठी बीएस-6 ह्या अद्यावत आधुनिक सेवायुक्त अशा 5 बसेस सांगली आगारास दैनंदिन चालनासाठी उपलब्ध झाल्या असुन सांगली मध्यवर्ती बसस्थानक येथे ह्या बसेसचा लोकार्पण सोहळा आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडला. या 5 गाड्यांचे पूजन आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या बसेसमधून फेरफटकाही मारला. यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ म्हणाले, सांगलीसाठी २०० बसेसची मागणी केली आहे त्याचीही पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे.

बीएस-6 च्या अद्यावत बस मध्ये ४१ सीट सहित अत्याधुनिक सुविधा आहेत. जसे की रिव्हर्स कॅमेरा, ऑटोमॅटिक डोअर सिस्टिम, अग्निविरोधी, पुश बकेट सीट (आरामदायी सीट), प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत.  यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, महिला आघाडी प्रमुख सुनिता मोरे, आंबेगिरी मॅडम,  भाजपा पदाधिकारी अविनाश मोहिते, गजानन नलवडे, स्नेहजा जगताप रवींद्र वादवणे, विजय साळुंखे, संदीप ताटे यांच्यासह विभाग नियंत्रक सुनील भोकरे, आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, स्थानक प्रमुख महेश पाटील, कार्यशाळा सहाय्यक प्रवीण कांबळे व्यांच्यासह आगार व्यवस्थापक एसटी अधिकारी कर्मचारी चालक वाहक उपस्थित होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.