मोदीजींची वेळ संपली! ते सरसंघचालकांना का भेटले; पुढचा वारसदार कोण- राऊतांनी सांगितलं वाचा 4 मुद्यांत
पंतप्रधान नरेंद्र मोदींना नागपूर येथे संघमुख्यालयात जावे लागते, सरसंघचालकांची भेट घ्यावी लागते. ही साधी गोष्ट नाही. मोदीजींची वेळ आता संपली आहे. त्यांना केदारनाथाचे दर्शन घेऊन गुहेत जावे लागेल आणि आता त्यांचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातील असेल असे वक्तव्य शिवसेना युबीटी नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या दोन गोष्टी आहेत, त्या मला उमगल्या. त्यात एक तर आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघ परिवाराला देशाच्या नैतृत्वात बदल हवा आहे. मोदीजींची वेळ संपली आता देशाला बदल हवाय. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षही संघ आपल्या मर्जीनुसार निवडू इच्छितो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले आहेत.
भाजपसोबत जो राहील तो मराठीविरोधी
संजय राऊत म्हणाले,लोकसभा निवडणुकीवेळी आणि विधानसभा निवडणुकीवेळीही ते हिंदुत्वाची भाषा करत होते. अचानक आता मराठी माणसांची भाषा केली आहे, पण भाजपने मराठी माणसांची संघटना असलेला शिवसेना पक्षाशी युती तोडलेली आहे, तुम्ही बघा राज ठाकरेंचे राजकारण भाजपला समर्थन देणारे आहे. मराठी माणूस नेहमी शिवसेनेसोबत राहीला आणि त्यांनाच तोडणाऱ्या भाजपसोबत जो राहील तो मराठीविरोधी असेल.
1. पंतप्रधान मोदी नागपूरला का गेले?पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात भेट झाली याचा अर्थ संजय राऊत यांनी उलगडून दाखवला. संजय राऊत म्हणाले, जी माहिती बाहेर आली, त्यानुसार सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर एक धोरण जाहीर केले ते हे की, पंच्याहत्तर वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे सरसंघचालकांनी नरेंद्र मोदी यांना त्यांच्याच वक्तव्याची आठवण करुन देण्यासाठी भेट घेतली. आता देशाचे नैतृत्व बदलण्याची त्यांची वेळ आली आहे.2. पंतप्रधानांना नागपूरला जावे लागते साधी गोष्ट नाहीसंजय राऊत म्हणाले, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीत संघाची भूमिका आहे आणि त्यानुसार, संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची स्पष्ट भूमिका दिसते. पंतप्रधानांना नागपूरला जाऊन सरसंघचालकांना भेटावे लागते ही काही साधी गोष्ट नाही. मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागते हे समजुन येते.3. प्रत्येकाला सत्ता सोडावी लागेल..!संजय राऊत म्हणाले, प्रत्येकाला सत्ता सोडावी लागेल. हिंदुस्तान हा देश नाॅन बायोलाकल नाही. सहकाऱ्यांसाठी जे धोरण तुम्ही जनतेला कितीही मूर्ख बनवायचा प्रयत्न केला तरीही त्यांना पंच्याहत्तरीनंतर मोदींना निवृत्त व्हावेच लागेल आणि केदारनाथच्या गुहेत जावेच लागेल. फकीर आदमी है.. झुला लेकर आए थे...अब झोला भरकर जाएगा...4. मोदींचा वारसदार कोण?संजय राऊत म्हणाले, मोदींचे वारसदार कोण हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ठरवेल म्हणूनच मोदींना काल बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. संघाची चर्चा ही बंद दाराआड असते आणि ती शक्यतो बाहेर येत नाही पण काही संकेत जे असतात ते स्पष्ट आहे. संघ ठरवेल की, मोदींचा वारसदार कोण आहे आणि तो बहुतेक महाराष्ट्रातील असेल असेही संजय राऊत यांनी शेवटी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.