Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जुम्मेच्या नमाजाच्या वेळेत होळी खेळण्यात 2 तासांचा ब्रेक घ्या ; महापौर अंजुम आरा यांचे वादग्रस्त वक्तव्य

जुम्मेच्या नमाजाच्या वेळेत होळी खेळण्यात 2 तासांचा ब्रेक घ्या ; महापौर अंजुम आरा यांचे वादग्रस्त वक्तव्य
 

दरभंगा: नगरपालिकेचे महापौर अंजुम आरा यांनी जुम्मेच्या नमाजाच्या वेळेत होळी खेळण्यात ब्रेक घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी होळी खेळणाऱ्या नागरिकांना दुपारी 12.30 ते 2.00 या वेळेत होळी न खेळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, नमाजाची वेळ बदलणे शक्य नाही, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.

 
नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन
महापौर अंजुम आरा यांनी नमाजाच्या वेळी मस्जिद आणि नमाज पठणाच्या ठिकाणांपासून दूर राहण्याची विनंती केली आहे. त्यांनी यापूर्वी देखील रमजान आणि होळी एकाच वेळी शांततेत पार पडल्याचे सांगितले. तसेच, जिल्हा प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
BJP कडून तीव्र विरोध

महापौरांच्या यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते कुन्तल कृष्णा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले की, सतत हिंदूंनाच गंगा-जमूनी तहजीब पाळण्यास का सांगितले जाते? जर हिंदूंनी सहकार्य करायचे असेल, तर मुस्लिमांनीही विचार करावा की होळी वर्षातून फक्त एकदाच येते.

दरभंगामध्ये होळीवरून वाद पेटण्याची शक्यता
मेयर अंजुम आरा यांच्या या वक्तव्यावर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, भाजपने त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.