Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहायला 1 कोटींचा बंगला, फिरायला विमान, तरीही करायचा चिंधीगिरी, सोलापुरात भामट्याला अटक

राहायला 1 कोटींचा बंगला, फिरायला विमान, तरीही करायचा चिंधीगिरी, सोलापुरात भामट्याला अटक
 

सोलापूर: सोलापुरात एका अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा चोरी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करून विमानाने प्रवास करायचा. जिथे चोरी करायची आहे, त्या शहरात गुन्हा करून तो पुन्हा विमानाने आपल्या मूळगावी परतायचा, या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा घरफोडी करणारा भामटा एक कोटींच्या बंगल्यात राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश मधून महाराष्ट्रात विमान प्रवास करून चोरटा मुंबईत यायचा.

यानंतर तो रेल्वेने सोलापूर गाठायचा. सोलापुरात घरफोडी केल्यानंतर परत तो उत्तर प्रदेश येथील लखनऊला जायचा. त्यासाठी मुंबईतून तो विमानाने प्रवास करायचा. आंतरराज्य चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल चोराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.. सोलापुरातील शिक्षणाधिकाऱ्याच्या घरी कोणी नसताना घरफोडी करून चोरी करणाऱ्या प्रकरणात आंतरराज्य गुन्हेगाराला सोलापूर गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. चोरटा अनिल कुमार मिस्त्रीलाल राजभर याच्यावर राज्यभरात तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत.

अनिल कुमार राजभर हा उत्तर प्रदेश येथील लखनऊ शहरातील रहिवासी आहे. तो लखनऊ मधून घरफोडी करण्यासाठी विविध राज्यात जात असत. उत्तर प्रदेश येथून दुसऱ्या राज्यात चोरी किंवा घरफोडी करण्यासाठी विमानाने जात होता. त्या राज्यात गेल्यानंतर इतर शहरात जाण्यासाठी तो बाय रोड किंवा रेल्वे प्रवास करत असल्याचे समोर आला आहे.
 
अलीकडेच सोलापुरात शिक्षणधिकाऱ्याच्या घरी त्याने चोरी केली होती. त्यानंतर तो उत्तर प्रदेशात निघून गेला. मात्र सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेला अनिल कुमार राजभर हा गुन्हा करण्यासाठी सोलापुरात येत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास केल्यानंतर अनिल कुमार राजभर हा पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्याच्याकडून अकरा तोळे सोने आणि 113 ग्रॅमचे चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.. सोलापुरातील जेलरोड पोलीस आणि सिन्नर येथील गुन्हे उघडीस आले आहे..

या प्रकरणी अधिक तपास केला असता आरोपी अनिल कुमार याचा उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे एक कोटींचा बंगला असल्याचं समोर आला आहे. त्याच्यावर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात विविध गुन्हे दाखल असल्याचेही समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपी भामट्याला अटक केली आहे, त्याची कसून चौकशी केली जात आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.