सांगली-माधवनगर रस्त्यावर अलिशान चारचाकी चालकाने हिट अँड रन करत थरकाप उडवला. तीन गावातील सात ते आठ दुचाकींना उडवत भरधाव वेगाने पळ काढला. तीन गावाच्या लोकांनी पाठलाग करून त्याला खोतवाडी येथे गाठले. शेतात त्याची चारचाकी अडवून धरली. जमावाला पोलिसांनी तत्काळ पांगवत चालकाला ताब्यात घेतले. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. कार चालक आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील असल्याचे समजते. दरम्यान, चार ते पाच जण जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती.
गोमेवाडीतील एक तरूण अलिशान चारचाकी घेवून सांगलीत आला होता. त्याच्यासोबत एक महिला देखील होती. तो चारचाकी घेऊन माधवनगर ते बुधगाव या रोडवरून आज रात्री दहाच्या सुमारास सुमारास निघाला. भरधाव वेगाने असणाऱ्या चालकाने माधवनगर येथे एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर संतप्त जमाव त्याचा पाठलाग करत होता. रस्त्यावर येणाऱ्या पाच ते सहा दुचाकींना धडक देत तो भरधाव कार चालवत खोतवाडीच्या दिशेने पुढे गेला. दरम्यान, जमावाने त्याला गाठून बेदम चोप देऊन कार चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.