Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीला मिळाल्या अत्याधुनिक नव्या 10 बसेस

सांगलीला मिळाल्या अत्याधुनिक नव्या 10 बसेस

सांगली : भंगार बसेसचा सामना करावा लागणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगाराला काल, शुक्रवारी नव्या कोर्‍या अत्याधुनिक दहा बसेस मिळाल्या. येत्या दीड महिन्यात आणखी 50 बसेस मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


सांगली परिवहन महामंडळाला गेल्या दोन वर्षात जवळपास दोनशेहून अधिक बसेस भंगारात काढाव्या लागल्या आहेत. यामुळे सुमारे अडीचशे बसेसची कमतरता आहे. काही बसेस नादुरुस्त असल्यामुळे लांब पल्ल्याच्या सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे परिवहन महामंडळाकडे जिल्हा प्रशासनाकडून शंभर बसेसची मागणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात दहा बसेस ताफ्यात सामील झाल्या. शुक्रवारी यातील पाच बसेस प्रत्यक्षात आगारात पोहोचल्या. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज, शनिवारी सकाळी 11 वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते या बसेसचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील इतर आगारातही दीड महिन्यात टप्प्या-टप्प्याने 50 बसेस येणार आहेत. नव्या बसेस या लांब पल्ल्यासाठी सोडण्यात येणार असून, शनिवारपासूनच या बसेसची सेवा नियमितपणे सुरू होईल, अशी माहिती सहायक कार्यशाळा अधीक्षक सौरभ औंधकर यांनी दिली. यावेळी अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

बसमध्ये आहेत या सुविधा...

41 सीटच्या या बसमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे. अ‍ॅटोमेटिक डोअर सिस्टिम आहे. अग्निविरोधी सुविधा यामध्ये आहेत. पुश बकेट सीट (आरामदायी सीट), प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.