Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उत्तर प्रदेशात होळी आधी योगींचा दणका; संवेदनशील 10 जिल्ह्यांमध्ये ताडपत्र्यांनी मशिदी झाकल्या, नमाज्याच्या वेळाही बदलल्या!!

उत्तर प्रदेशात होळी आधी योगींचा दणका; संवेदनशील 10 जिल्ह्यांमध्ये ताडपत्र्यांनी मशिदी झाकल्या, नमाज्याच्या वेळाही बदलल्या!!
 

लखनऊ : उत्तर प्रदेश होळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करावी. त्यामध्ये कुठलाही अडथळा उत्पन्न होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली असून संभल, वाराणसी, उन्नाव, शहाजहापूर, जौनपूर, औरया, ललितपुर, मिर्झापूर, लखनऊ, मुरादाबाद, रामपूर आदी १० जिल्ह्यांमध्ये होळीच्या मिरवणुकीच्या रस्त्यांवर असणाऱ्या मशिदी तिथल्या मुस्लिम समाजाने ताडपत्र्यांनी झाकून टाकल्या आहेत.

मुस्लिम धर्मगुरूंनी नमाजाच्या वेळा दुपारी २.३० नंतर ठेवल्या आहेत. होळी शुक्रवारी येत असून रमजान महिन्यात शुक्रवारच्या नमाजाला महत्त्व आहे, पण होळी एकदाच येते आणि शुक्रवार 52 येतात असे वक्तव्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील होळी सण साजरा करण्यात कुठलाही अडथळा येऊ नये, त्यासाठी योगी सरकारने योग्य ती काळजी घेतली आहे.

उत्तर प्रदेशातल्या विविध शहरांमध्ये होळी वेगवेगळ्या पद्धतीने परंतु पारंपारिक रीतीने साजरी करण्याची परंपरा आहे. यामध्ये शहाजहापूर मधल्या लाट साहेब होळीचा देखील समावेश आहे. यात लाट साहेब म्हणजे ब्रिटिश अधिकारी असे समजून त्याला चप्पल बुटांचा हार घालून रेड्याच्या गाडीवर बसवून मिरवणुकी द्वारे फिरवले जाते. हा मिरवणूक मार्ग तब्बल ८ किलोमीटरचा असून मात्र या मिरवणुकीच्या मार्गामध्ये छोट्या-मोठ्या ६८ मशिदी येत असल्याने त्या सगळ्या मशिदी मुस्लिमांनी ताडपत्र्यांनी झाकून टाकल्या आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी तिथे चोख बंदोबस्त ठेवला आहे. 
 
होळी मिरवणुकीच्या वेळी कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये किंवा दगडफेकीसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी ही काळजी पोलिसांनी घेतली आहे. उत्तर प्रदेश मधल्या बाकी सर्व शहरांमध्ये याच स्वरूपाची व्यवस्था योगी सरकारच्या सूचनेनुसार मुस्लिम समाजाने आणि पोलिसांनी केली आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी नमाजाच्या वेळा बदलून साधारणपणे दुपारी २.३० नंतरच्या ठेवल्या असून पोलीस प्रशासनाला आपले पूर्ण सहकार्य असल्याचे जाहीर केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.