Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुले भिडली; मोठ्यानं दिला मृतदेहाचे दोन तुकडे करण्याचा सल्ला

वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुले भिडली; मोठ्यानं दिला मृतदेहाचे दोन तुकडे करण्याचा सल्ला
 

मध्य प्रदेशात वडिलांच्या अंत्यसंस्कारावरून दोन मुलांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही मुलांना वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते. दोघांचेही आपापले दावे होते. दरम्यान, वडिलांचा मृतदेह तसाच पडून राहिला.

अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र चितेला अग्नी कोणी द्यायचा यावरून वाद निर्माण झाला व ग्रामस्थ व नातेवाईक ताटकळत उभे राहिले. मध्य प्रदेशातील टीकमगडमध्ये हा अनोखा प्रकार समोर आला आहे. वडिलांवर अंत्यसंस्कार कोण करणार यावरून दोन्ही मुलांमध्ये भांडण झाले. धाकट्या मुलाने वडिलांची सेवा केल्यामुळे त्याला वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते, तर मोठ्या मुलाचा स्वत:चा दावा होता. गावकऱ्यांना ही बाब कळताच ते स्तब्ध झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, टीकमगड जिल्ह्यातील जटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामपंचायत ताल लिधौरा येथे ८५ वर्षीय ध्यानी सिंह घोष यांचा मृत्यू झाला. दरम्यान ध्यानीसिंग यांचा धाकटा मुलगा दामोदरसिंग याने आपल्या वडिलांची काळजी घेतली होती. त्याने वडिलांची सेवा केली होती. धाकट्या मुलाच्या घरातच वडिलांचा मृत्यू झाला होती. त्यामुळेच त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार करायची इच्छा व्यक्त करत अंत्यविधीची तयारीही केली होती.

दरम्यान, ध्यानी सिंग यांचा मोठा मुलगा आपल्या कुटुंबासह तेथे पोहोचला. मोठा मुलगा असल्याने वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार माझाच असल्याचे त्याने सांगितले. यावर धाकट्या मुलाने म्हटले की, मी वडिलांची सेवा केली आहे, त्यामुळे मीच अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले. मात्र मोठा मुलगा आपल्या दाव्यावर ठाम होता.

मृतदेहाचे तुकडे करण्याची भाषा -
थोरल्या मुलाने मृतदेहाचे दोन तुकडे करण्याची भाषा केली. त्याने धाकट्या भावाला मृतदेहाचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. यावेळी वडिलांचा मृतदेह तब्बल ५ तास पडून होता. दरम्यान, तेथे उपस्थित ग्रामस्थांना ही बाब समजताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मुलांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.