मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले"; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर मोठा दावा
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून त्याला ताब्यात घेतलं आहे. स्वारगेट पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून त्याला आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तत्पूर्वी त्याने पोलिसांसमोर मोठा दावा केला आहे.
दत्ता गाडेला सध्या लष्कर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. तिथे त्याची चौकशी केली जाते आहे. याठिकाणी पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील दाखल झाल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जाते आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने पोलीस कोठडीत टाहो फोडला आहे. माझं चुकलं, मी पापी आहे, असं म्हणत तो रडत असल्याचं पुढे आलं आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावाही त्याने पोलिसांसमोर केला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
कशी झाली दत्ता गाडेला अटक?
आरोपी दत्ता गाडे गुनाट गावातील उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, १०० पोलीस, ड्रोन, श्वान पथकं गावात दाखल झाले होते. २५ एकर शेतात पहाणी करुनही आरोपी न सापडल्याने तेथील शोधमोहीम काही वेळ थांबवण्यात आली. यादरम्यान, जेवण आणि पाणी नसल्याने आरोपी दत्ता गाडे कासावीस झाला होता. मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान तो एका महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी गेला. महिलेने तात्काळ पोलिसांना फोन केला. पण दत्ता खाडे तिथून पळाला आणि कॅनॉलच्या खड्डयात लपून बसला. यावेळी पोलिसांनी आरोपीला सगळीकडून घेरले. ग्रामस्थांनी आरोपीसोबत संवाद साधला आणि त्याला शरण येण्यास भाग पाडलं. त्यानंतर दत्ता गाडे पोलिसांसमोर शरण आला आणि त्याला अटक करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.