आयोध्येत दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला आहे. यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या ट्विटनंतर आता खासदार अवधेश प्रसाद यांचा व्हिडीओ समोर आलाय.
खासदार अवधेश प्रसाद यांनी या प्रकऱणी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. खासदार अवधेश प्रसाद यांनी प्रभू रामचंद्रांचा नामजप केला. त्यावेळीच त्यांना अश्रू अनावर झाले. हा प्रश्न आपण लोकसभेत पंतप्रधानांसमोर उपस्थित करू असं अवधेश प्रसाद म्हणाले. न्याय मिळाला नाही तर राजीनामा देईन असा इशाराही खासदार अवधेश प्रसाद यांनी दिला आहे.
देशाच्या लेकीचं काय झालं असं म्हणत खासदार अवधेश प्रसाद यांना रडू कोसळलं. यावेळी सहकाऱ्यांनी त्यांना सावरलं. सपा खासदार अवधेश कुमार म्हणाले की, मला दिल्लाला जाऊदे, लोकसभेत जाऊन मोदींसमोर हा मुद्दा मांडेन. न्याय मिळाला नाही तर लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देईन. मुलीची अब्रू वाचवू शकलो नाही. इतिहास काय म्हणेल? लेकीसोबत हे काय झालं. हे देवा... असं म्हणत खासदार अवधेश कुमार भर पत्रकार परिषदेत रडले. अवधेश कुमार यांना त्यांच्या समर्थकांनी सावरलं. यावेळी अवधेश कुमार हे डोक्यावर हात मारून घेत प्रभू रामचंद्रांचं नाव घेत होते. हे प्रभू रामचंद्र तुम्ही कुठे आहात, कुठे आहात देवा असंही ते म्हणत होते.अयोध्येतील एका गावातल्या जंगलात शनिवारी तरुणीचा मृतदेह आढळून आलाय. घरापासून काही अंतरावरच झाडीमध्ये नग्नावस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. हत्येची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी ३ डॉक्टरांच्या पॅनलकडून शवविच्छेदन करून घेतलं. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबकडूनही तपासणी करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून तरुणी बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी बलात्काराची शंका व्यक्त केलीय. तिचे कपडे, देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे तीन ग्लासही आढळून आले आहेत. तिच्या शरिरावर नखांचे ओरखडे आणि जखमांच्या खुणा आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.