Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर

नाशिक-सूरत महामार्गावर भीषण अपघात, बस 200 फूट दरीत कोसळली, ७ जण जागीच ठार, १५ जणांची प्रकृती गंभीर
 
 
जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. पहाटे साडेपाच वाजता अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. 

नाशिक - सुरत महामार्गावर सापुतारा घाटात खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झालाय. खासगी बस 200 फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात 7 जण जागीच ठार तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आज पहाटे 5:30 वआजेच्या दरम्यान अपघात झाला.

भीषण अपघातात बसचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेश मधील असल्याची माहिती मिळत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.