Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 कोटींच्या खंडणी प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याला अटक

10 कोटींच्या खंडणी प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याला अटक
 

एका  बांधकाम व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या रकमेतील 25 लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा रचून कारवाई करण्यात आली.

बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (34) याचे वरळीत एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात स्वप्नील बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. त्यासाठी बांदेकर यांनी दहा कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड होऊन दीड कोटी रुपये ठरले. त्या खंडणीच्या रकमेतील 26 लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्या वतीने हिमांश शहा वय (45)आला होता.

शनिवारी रात्री भाईंदर येथील बनाना लिफ हॉटेलमध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून शहा याला अटक केली. त्यानंतर वसई येथून माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर तसेच त्याचे त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांनी दिली. स्वप्नील बांदेकर हे वसई विरार महापालिकेत 2015 ते 2020 या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते. शिवसेनेच्या बंडानंतर ते ठाकरे गटातच राहिले

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.