Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी. VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास

मुंबईतल्या विक्रोळीमध्ये मजुराची १३व्या मजल्यावरुन उडी; दोनदा जाळीत अडकला अन् शेवटी. VIDEO पाहताना तुम्हीही रोखून धराल श्वास
 

सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक घडलेल्या घडनांचे अपडेट मिळत असतात. मग घटना जगाच्या कोणत्याही गावात किंवा शहरात घडलेली असो. मग कधी कोणत्या घटना अतिशय भितीदायक असतात तर कधी हैराण करणाऱ्या असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ बघून अंगावर काटा येतो. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जो व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल की नशिब म्हणजे नक्की काय असतं? चला तर पाहूयात नेमके काय घडले असेल. आत्महत्येचा दोनदा प्रयत्न करुन १३ व्या मजल्यावरून उडी मारुनही कामगार कसा बचावला पाहा. 'देव तारी त्याला कोण मारी' असं म्हटलं जातं. त्याचा प्रत्ययच या घटनेनंतर आला आहे.

 
 

आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका मजुरानं थेट १३ व्या मजल्यावरुन खाली उडी मारलीय. या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

नेमकं काय घडलं?

ही घटना मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये एका बांधकाम सुरु असलेल्या इमरतीत घडली. कन्नमवार नगर भागात ५७ क्रमांकाच्या इमारतीच बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी काम करणारा कामगाराने इमारतीवरून आत्महत्या करण्यास उडी मारली. हा कामगार १३ व्या मजल्यावरून उडी मारूनही तीन वेळा सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यांमद्ये अडकून ही सुरक्षित राहीला. बिरजूप्रसाद रमेश बनरवा असे या कामगाराचे नाव असून तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. काल तो काम करीत असलेल्या ५७ क्रमांकाच्या इमारतीच्या तेराव्या मजल्यावर गेला तिथून त्याने खाली उडी मारली. परंतु तो आठव्या मजल्यावर लावण्यात आलेल्या जाळीत अडकला. तिथून ही त्याने उडी मारली तर तिसऱ्या मजल्यावरील जळीत अडकला तिथूनही उडी मारल्यावर खाली लोकांनी पकडलेल्या जाळीत पडला आणि त्याचा जीव वाचवला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मजुराला वाचवण्यात आलं आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.