गुजरात: अहमदाबाद येथे तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षीय विद्यार्थिनीचा व हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शाळेचा जिना चढली आणि दम लागला आणि वर्गाच्या बाहेरच अचानक कोसाळली. चिमुरडी कोसळल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी मृत्युचे कारण हार्ट अटॅक सांगितले आहे. शाळेतील सीसीटीव्ही देखील समोर आले आहे.
अहमदाबादच्या थलतेज परिसरात असलेल्या जेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये ही चिमुरडी शिक्षण घेत होती. समोर आलेल्या माहितीनुसार मुलगी तिसरीत होती. मिळालेल्या माहितीनुसार, एका विद्यार्थ्याने मुलीच्या छातीत दुखत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच चिमुकलीचा मृत्यू झाला. सकाळी 7.30 वाजता चिमुरडी शाळेत पोहचली होती. हार्ट अटॅकनंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलीला सीपीआर दिला, मात्र ती न उठल्याने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून प्राथमिक अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले.
काय आहे सीसीटीव्हीमध्ये?
या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या सीसीटीव्हीमध्ये चिमुकली तिची बॅग आणि टिफिन बॉक्ससह कॉरिडॉरमध्ये बराच वेळ उभी होती.कदाचीत तिच्या छातीत दुखत असल्याने तिला चालताना त्रास झाला. त्यानंतर कॉरिडॉरमध्ये असलेल्या एका बेन्चवर ती बसली आणि काही क्षणातच खाली कोसळली. मुलीला कोणताही आजार नव्हता शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार , मुलीचे पालक सध्या मुंबईत आहेत त्यामुळे त्यांना कळवण्यात आले आहे. प्रवेशाच्या वेळी मुलीला कोणताही आजार नव्हता. शाळेत प्रवेश घेताना सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.यामध्ये मुलीला कोणताही आजार नव्हता. घडलेली घटना अतिशय दु:खद आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.