प्रवासी बुकिंग करणाऱ्या प्रमुख कंपनी असलेल्या OYO ने भागीदार हॉटेल्ससाठी नवीन चेक-इन पॉलिसी लाँच केली आहे. ज्याची सुरुवात मेरठपासून झाली आहे. यापुढे आता अविवाहीत जोडप्यांना ओयोवरुन बुकिंग करता येणार नाही. त्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ओयोवरुन बुकिंग झाल्यानंतर काही घटना घडल्या होत्या, त्यानंतर आता OYO ने चेक इनचे धोरण निश्चित केले आहे.
ओयोद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये यावर्षी पासून अविवाहित जोडप्यांना यापुढे चेक इन करण्यासाठी एंट्री दिली जाणार नाही. सुधारित धोरणांतर्गत, सर्व जोडप्यांना वैध पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल. ऑनलाइन केलेल्या बुकिंगसह चेक-इनच्या वेळी नातेसंबंधाचा पुरावा. OYO ने आपल्या भागीदार हॉटेल्सच्या निर्णयावर आधारित, स्थानिक सामाजिक संवेदनशीलतेच्या अनुषंगाने जोडप्यांची बुकिंग नाकारण्याचा अधिकार दिला आहे, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.
मेरठमधून या धोरणाची अंमलबजावणी
OYO ने तत्काळ याची अंमलबजावणी करण्यासाठी व खात्रीसाठी मेरठमधील त्यांच्या भागीदार हॉटेलांना निर्देश दिले आहेत. ग्राउंड फीडबॅकच्या आधारे, कंपनी अधिक शहरांमध्ये याचा विस्तार करू शकते, असेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अविवाहीत जोडप्यांना प्रवेश नको म्हणून लोक कोर्टात गेले
मिळालेल्या माहितीनुसार, OYO ला काही दिवसांपासून समाजातून काही अभिप्राय मिळाले होते. विशेषतः मेरठमध्ये या समस्येचे निराकरण करण्यासाठी कृती करण्याची विनंती केली आहे. याव्यतिरिक्त, इतर काही शहरांतील रहिवाशांनी अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेलमध्ये चेक-इन करण्यास मनाई करण्यासाठी याचिका केलेली आहे. त्यामुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. OYO उत्तर भारताचे क्षेत्र प्रमुख पावस शर्मा यांनी PTI शी बोलताना सांगितले की, OYO सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्य पद्धती टिकवून ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे.
आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्य आदर करत असताना, आम्ही कायद्याची अंमलबजावणी आणि स्थानिक लोकांचे मत देखील जाणून घेतले. ती आमची जबाबदारीच असल्याचे शर्मा यांनी सांगितले. शर्मा म्हणाले की, आम्ही ज्या सुक्ष्म बाजारात काम करत आहोत. त्यामधील समाज गट. आम्ही या धोरणाचे आणि त्याच्या परिणामाचे वेळोवेळी पुनरावलोकन करत राहू. हा उपक्रम कालबाह्य समज बदलण्यासाठी आणि कुटुंब, विद्यार्थी, व्यवसाय, धार्मिक आणि एकल प्रवासी यांना सुरक्षित अनुभव देणारा ब्रँड म्हणून प्रक्षेपित करण्यासाठी OYO च्या कार्यक्रमाचा एक भाग आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.