NDA ला मोठा झटका! नितीश कुमार यांनी सोडली भाजपाची साथ, मणिपूरमध्ये बिघडलं राजकीय गणित
मणिपूरमध्ये भाजपाला फार मोठा धक्का बसला आहे. याचं कारण एनडीएमध्ये सामील असणाऱ्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने मणिपूरमध्ये एन बीरने सिंह यांच्या नेतृत्वातील सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.
आपले एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासिर आता विरोधी पक्षात बसतील असं जेडीयूने स्पष्ट केलं आहे. जेडीयूने राज्यपालांना पत्र लिहून पाठिंबा मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
जेडीयूने घेतलेल्या या निर्णयाचा मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारवर कोणताही प्रभाव होणार असून, सरकार स्थिरच आहे. पण या निर्णयामागे अनेक राजकीय गणितं असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं कारण जेडीयू केंद्र सरकार आणि बिहारमध्ये भाजपाच्या प्रमुख मित्र पक्षांपैकी एक आहे.
भाजपाचा पाठिंबा मागे घेण्याची घोषणा जेडीयूच्या मणिपूर युनिटचे प्रमुख क्षेत्रीमायुम बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना पत्र लिहून केली आहे.
जेडीयूने पत्रात म्हटलं आहे की, 2022 च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीत पक्षाने सुरुवातीला सहा जागा जिंकल्या होत्या. तथापि, नंतर पाच आमदार भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ अधिक मजबूत झाले. या पाच आमदारांचा खटला भारतीय संविधानाच्या १० व्या अनुसूचीअंतर्गत सभापतींच्या न्यायाधिकरणासमोर प्रलंबित आहे.
जेडीयूच्या इंडिया ब्लॉकसोबतच्या पूर्वीच्या युतीचा हवाला देत पत्रात पाठिंबा काढून घेतल्याची पुष्टी करण्यात आली आहे. पत्रात असंही म्हटलं आहे की मणिपूरमधील जेडीयूचे एकमेव आमदार मोहम्मद अब्दुल नासिर हे विधानसभेच्या अलिकडच्या अधिवेशनात विरोधी पक्षांसोबत बसले होते.
गेल्या वर्षी मेघालयात अशाच प्रकारच्या घडामोडींनंतर जेडीयूने कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. दरम्यान, जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार गेल्या वर्षी इंडिया ब्लॉकसोबत युती केल्यानंतर एनडीएमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, ते केंद्रात आणि राज्यात एनडीएमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, केंद्र आणि राज्यात एनडीएसाठी जेडीयूची भूमिका महत्त्वाची बनली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.