Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वप्नवत यश! महाराष्ट्रातील ज्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर भाजी विकली, तिथेच IPS म्हणून आले, वाचा हृदयस्पर्शी कहाणी

स्वप्नवत यश! महाराष्ट्रातील ज्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर भाजी विकली, तिथेच IPS म्हणून आले, वाचा हृदयस्पर्शी कहाणी
 

कोणीतरी म्हटलेच आहे, कठोर मेहनत आणि दृढ़ संकल्प एखाद्याचे आयुष्य बदलून टाकते. यांचे जिवंत उदाहरण आहे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी डीएसपी नितिन बगाटे यांचा जीवनप्रवास. नितीन एका गरीब कुटूंबात वाढले, कधी काळी ते पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर भाजी विकत होते, कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की, एक दिवस ते याच कार्यालयात आयपीएस बनून येतील. नितीन यांच्या कहाणीतून समजते की, सचोटी व मेहनतीने जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 

नितीन बगाटे  हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. नितीन आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शहरातील एसपी ऑफिसच्या जवळ भाजी विकत होते. त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी सिविल सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक आव्हाने व अडचणींवर मात करत नितीन यांनी आपल्या सोबत कुटूंबीयांचे स्वप्न साकार केले.

अनेक अपयशानंतर बनले IPS -
 
नितीनला यूपीएससीची तयार करताना अनेकवेळा अपयश आले. अनेक वर्षे मेहनत करूनही तीन वेळी मुलाखतीपर्यंत जाऊनही यश मिळाले नाही. मात्र हार न मानता त्यांनी अपयशातून धडा घेत तयारी सुरूच ठेवली व शेवटटी २०२६ मध्ये त्यांनी यश खेचून आणत आयपीएस पद मिळवले.

सध्या DSP पदावर कार्यरत -
नितीन छत्रपती संभाजीनगरमध्ये डीएसपी पदावर कार्यरत आहे. त्यांची कहाणी अनेक तरुणांना प्रेरणा देते की, स्वप्न कितीही मोठे व आव्हानांनी भरले असले तरी कठोर मेहनत व दृढ संकल्पाने साकार केले जाऊ शकते. संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली होण्याआधी त्यांनी सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे. 

सप्टेंबर २०२३ पासून ते संभाजीनगरात डीएसपी आहेत. आयपीएस अधिकारी बनल्यानंतर परभणी येथे २०१८ ते २०२० याकाळात ते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. नितीन बगाटे यांची दबंग अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग येथे काम केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.