Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्रातील GBS च्या वाढत्या रुग्णांमुळे मोदी सरकारचा मोठा निर्णय; 7 तज्ज्ञ लावले कामाला

महाराष्ट्रातील GBS च्या वाढत्या रुग्णांमुळे मोदी सरकारचा मोठा निर्णय; 7 तज्ज्ञ लावले कामाला
 

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराचे महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यातच या आजाराची पुण्यात लागण झालेल्या एका तरुणाचा शनिवारी सोलापुरात मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात जीबीएसचा पहिला बळी गेल्यानंतर मोदी सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. आजाराला आळा घालण्यासाठी सरकारने सात तज्ज्ञ सदस्यांची उच्च सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती महाराष्ट्राला आजार रोखण्यासाठी सर्वतऱ्हेने मदत करणार आहे.

देशात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यातही पुणे जिल्हा हॉटस्पाट बनला आहे. रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेल्याने या आजाराविषयी भीती वाढतच चालली आहे. आजार नेमका कशामुळे होतो, याबाबतही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे. दुषित पाणी, शिळे अन्न आदी कारणे सांगितली जात असली तरी अद्याप ठोस माहिती पुढे आलेली नाही.
प्रशासनाकडून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जात आहे. पुण्यात प्रशासनाने घरोघरी जाऊन जनजागृतीचे काम सुरू केले असून संशयितांची माहितीही संकलित केली जात आहे. राज्य पातळीवरही उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण या आजाराचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळून येत असल्याने देशाचे लक्ष कोरोनानंतर पुन्हा कदा जीबीएसकडे वळले आहे.
 
मोफत उपचार आरोग्य विभागाने जीबीएस या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला आहे. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. पुण्यात कमला नेहरू रुग्णालयात सर्वच रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जाहीर केले आहे.

काय आहेत लक्षणे?
- श्वसनास त्रास होणे

- हातापायांना झिणझिण्या येणे

- रक्तदाबाची समस्या निर्माण होते

- चालताना अडचण येणे

- चेहऱ्यावर कमजोरी येणे

- अतिसार

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.