Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News ! अपात्र लाडक्या बहि‍णींवर कारवाई, ५ महिन्याचे ७५०० रूपये सरकारने घेतले माघारी

Breaking News ! अपात्र लाडक्या बहि‍णींवर कारवाई, ५ महिन्याचे ७५०० रूपये सरकारने घेतले माघारी
 

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. आतापर्यंत महिलांना ६ हप्ते देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

मात्र, ही योजना बंद होणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातील पैसे काढून घेण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करुनदेखील अर्ज केले आहे त्या महिलांकडून आता पैसे माघारी घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतलेल्या एका महिलेच्या खात्यातून पैसे पुन्हा घेण्यात आले आहे. धुळ्यातील एका लाभार्थी महिलेला आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र, ही महिला निकषांमध्ये बसत नसल्याने तिच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. या योजनेत धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एक महिलेचे ७५०० रुपये परत घेतले आहे. महिला पात्र नसतानाही तिने अर्ज केला होता. त्यामुळे तिचे पैसे सरकारने परत घेतल्याचे समोर आले आहे.

या महिलेने अन्य एका योजनेचा लाभ घेतला होता. त्यामुळे या महिलेला पैसे पुन्हा देण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार सरकारी तिजोरीत ७५०० रुपये जमा झाले आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.धुळ्यातील या महिलेने दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई झाली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीला सुरुवात झाली आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवले जात आहे. धुळे, गडचिरोली, वर्ध, जळगाव, पालघर या जिल्ह्यातून अपात्र महिलांनी अर्ज केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारींमुळे केसरी आणि पिवळे शिधापत्रक वगळता सर्व अर्जांची छाननी होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.