कुपवाड एमआयडीसी भागातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका कंपनीत २७ वर्षीय तरुण परप्रांतीयाचा खून झाल्याची घटना आज बुधवारी (दि. २९) रोजी सकाळी उघडकीस आली आहे. घटना स्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शेती संदर्भातील औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये कामगारांना राहण्याकरिता दोन खोल्या आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांच्यात रात्री वादावादी झाली. एकमेकांना मारहाणही करण्यात आली. घटनास्थळी जेवणाची भांडी सुद्धा पडलेली होती. रात्री दारूच्या नशेत २७ वर्षीय सहकाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची कबुली देत दोन परप्रांतीय संशयित हे सकाळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतः गुन्हा केल्याचे सांगत हजर झाले. सध्या कंपनीच्या आवारात कुपवाड पोलीस दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.