बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हल्ल्यानंतर सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
सैफ अली खान याच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याची माहिती मिळत असून सैफच्या मानेला 10 सेंटीमीटरची जखम झाली आहे. या हल्ल्यात सैफच्या घरातील एक कर्मचारी ही जखमी झाल्याचे समजते आहे. सैफ अली खान आणि चोरामध्ये झटापट झाली आणि या झटापटीत सैफवर चोरानं चाकूनं वार केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून तात्काळ सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या सैफवर सर्जरी सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी घरातील 3 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिघांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.