Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाउनलोड

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाउनलोड
 

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बारावीच्या परीक्षा या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र आजपासून म्हणजेच १० जानेवारी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं हॉलतिकीट हे ऑनलाईन स्वरूपात देखील मिळणार आहे. विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्र www.mahahsscboard.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येणार आहेत. याशिवाय महाविद्यालयातून देखील प्रवेशपत्र घेता येणार आहे.

दरम्यान, प्रवेश पत्रावर प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांचा सही शिक्का घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही. तसेच या संदर्भात काही तांत्रिक अडचणी आल्यास माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.