Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृष्णाकाठ चे कार्य कौतुकास्पद : प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन उत्साहात

कृष्णाकाठ चे कार्य कौतुकास्पद : प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे  कृष्णाकाठ दिनदर्शिका २०२५ चे  प्रकाशन उत्साहात 


सांगली:  नववर्ष व माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सलग ११ व्या वर्षी कृष्णाकाठ सोशल फौंडेशन,भिलवडी ता.पलूस  जि –सांगली या  सेवाभावी संस्थेतर्फे कृष्णाकाठची अस्मिता असणाऱ्या "कृष्णाकाठ दिनदर्शिका -२०२५" चा  प्रकाशन सोहळा भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली  येथे पार पडला. त्याच सोबत जि. प. मराठी शाळा भिलवडी सह सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी वितरण ही  करण्यात आले.  

सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना "कृष्णाकाठ फौंडेशन" चे संस्थापक अध्यक्ष अमोल वंडे यांनी संस्थेची भूमिका व कार्य याची माहिती दिली . कृष्णाकाठ चे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी " सर्वच मान्यवारांनी आपल्या मनोगतामधे संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली. 

कृष्णाकाठ फाऊंडेशन च्या विविध उपक्रमास डॉ. विश्वजीत कदम साहेब, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील, सचिव केतन मोरे, समीर कुलकर्णी यांच्या सह सर्वांचेच सहकार्य आहे . संस्थेला १० वर्षे पूर्ण होत असून  दिनदर्शिका, क्रीडा साहित्य  वाटप, विद्यार्थी दत्तक मदत, पूरग्रस्त मदत यासह या दहा वर्षात विविध शालेय व सामाजिक उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात आले आहेत  व भविष्यातही सक्रियरित्या विविध उपक्रम राबविण्याचा कृष्णाकाठ चा मानस आहे असे अध्यक्ष अमोल वंडे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे  यांच्या सह प्रा. अमर तुपे, प्रा. नितीन गायकवाड, प्रा. महेश कोल्हाळ, प्रा. तृशांत लोहार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. संस्थेचे मार्गदर्शक श्री. संपत जाधव यांनी आभार व्यक्त केले.
कृष्णाकाठ संस्थेस शैक्षणिक मदत 

कृष्णाकाठ फाऊंडेशन तर्फे केलेल्या शैक्षणिक  मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत संस्थेचे संचालक श्री. सदानंद होवाळ यांनी मदत केली. संस्थेच्या भावी उपक्रमांसाठी सातत्याने सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.