येवला : डी. फार्मसी म्हणजेच औषधनिर्माण शास्त्र पदविका घेतली की कोणीही कुठेही औषधी विक्री व्यवसाय सुरू करण्यास मोकळे, अशी आतापर्यंतची नियमावली होती. मात्र यात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने पाच वर्षांपासून एक्झिट पात्रता परीक्षेचा गतिरोधक टाकला होता.
परंतु वाढत्या तक्रारीमुळे पाच वर्षांनंतर हा निर्णय बदलत फार्मासिस्ट नोंदणीसाठी परवानगी मिळाल्याने पदविकाधारकांना 'गुड न्यूज' मिळाली आहे. रुग्णालय म्हटलं, की औषधी विक्री दुकान आलेच. या व्यवसायात गुणवत्ता आणि अचूकता यावी, या हेतूने शासनाने पात्रता (एक्झिट) परीक्षेचा निर्णय घेतला होता. डी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद करते. पण विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेसाठी परीक्षा द्यावी लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत होती.
यात आता बदल करत फार्मसी कौन्सिलने डिप्लोमा फार्मसीच्या विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. पुढील एक वर्षाकरिता त्यांना फार्मसिस्ट म्हणून नोंदणी करता येणार आहे. २०२३-२४ मध्ये डिप्लोमा फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य औषध परिषदेकडे फार्मसिस्ट प्रमाणपत्रासाठी नोंदणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
असे होणार बदल..
- परीक्षेसाठी ३ पेपर न होता एकच पेपर- परीक्षा शुल्क कमी- शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थी नोंदणीसाठी पात्र- विद्यार्थ्यांची नोंदणी किंवा फार्मसिस्ट म्हणून ओळख ही पुढील वर्षाकरिता- विद्यार्थ्यांचे पुढील नूतनीकरण परीक्षा उत्तीर्ण होऊनच करता येईल- जो विद्यार्थी उत्तीर्ण होणार नाही, त्याचे नूतनीकरण नाही- या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना ५०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर हमीपत्र देणे बंधनकारक''एक्झिट परीक्षेत होणारी दिरंगाई, परीक्षा शुल्क तसेच ५० टक्के गुण उत्तीर्ण होण्याचा निकष आदी गोष्टींवर सर्वांचा आक्षेप असल्यामुळे त्यात बदल अपेक्षित होते. काही महाविद्यालयाही या बदलाची मागणी केली होती. हा वर्षासाठी निर्णय झाला असला तरी तो कायमस्वरूपीसाठी बदल व्हावा.''- डॉ. पवन आव्हाड, विभागप्रमुख, मातोश्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.