सांगली :-जत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने कुटुंबाला बसला धक्का, इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले अन्..
पोलिसांनी संशयित हर्षवर्धन सर्जेराव देवकाते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
जत : जत तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली.
पीडिता गर्भवती राहिल्याने हे कुटुंबाच्या निदर्शनास आला. त्यानंतर जत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
त्यानुसार पोलिसांनी संशयित हर्षवर्धन सर्जेराव देवकाते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयिताने पीडितेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा अशीच घटना घडली. पीडिता गर्भवती राहिली. तसेच पीडितेस धमकी देण्यात आली. त्यानंतर जत पोलिस ठाम्यात गुन्हा नोंद करण्यात आला. संशयितास देवकाते याला अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.