साताऱ्यात अंधश्रद्धेचा कळस, ऊसाच्या शेतात नेऊन महिलेचं शीर धडा वेगळं केलं; मृतदेहाजवळ लिंबू-मिरची टाकली
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. उसाच्या शेतात या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आलाय.
मृतदेहाजवळ लिंबू, मिरची आणि हळदी कुंकु आढळून आलंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचलेत.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या विडणी गावामध्ये पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आला आहे. शेतात कपड्यावर साडी, हळदी, कुंकू, काळी बाहुली, महिलेचे केस, सुरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला मृतदेह देखील आढळून आल्यामुळे परिसरात अघोरी कृत्य करून महिलेची हत्या असल्याची चर्चा आहे. कंबरे खालचा भाग त्यांच्या शेतात आढळून आला आहे. घटना स्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. खून प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. प्रदीप जाधव हे त्यांच्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळवले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.