सिडको : परिसरातील एका युवकाच्या जीवनात घडलेली घटना समाजाच्या संवेदनांना हादरवणारी ठरली आहे. या घटनेने फक्त एका कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे लक्ष वेधले आहे. घटनेचा हा क्रम अत्यंत विचित्र आणि दु:खदायक आहे.
सिडको परिसरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात युवक आपल्या वडिलांसोबत राहतो. मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या युवकाचे वय लग्नयोग्य झाल्याने वडिलांनी त्याच्यासाठी अनुरूप वधू शोधण्यास सुरुवात केली. काही काळानंतर एका कुटुंबाशी संबंध जुळले आणि मुलीला पाहण्याचा कार्यक्रम ठरला. मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत पडले. त्यामुळे लग्नाची तारीख निश्चित झाली. या घटनेने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लग्नाच्या तयारीसाठी दोन्ही कुटुंबांत भेटीगाठी होऊ लागल्या. वधू आणि वराच्या कुटुंबीयांमधील संबंध अधिक गोड होत गेले. मात्र, याच भेटीगाठी दरम्यान युवकाच्या वडिलांनी होणाऱ्या वधूकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनाने पाहायला सुरुवात केली. त्यांच्या मनात त्या मुलीविषयी आकर्षण निर्माण झाले.
थोड्याच कालावधीत युवकाच्या वडिलांनी आपल्या स्वार्थी भावनांना आळा न घालता त्या मुलीशी गुपचूप लग्न केले. त्यांनी पळून जाऊन हा निर्णय घेतल्याने संपूर्ण कुटुंबात आणि समाजात खळबळ उडाली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चेचा विषय बनली. युवकाला या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला. वडिलांच्या या वर्तनामुळे त्याचे जगणेच अर्थहीन झाले. आपल्या वडिलांनी केलेल्या या कृत्याने खचलेल्या युवकाने संसार, कुटुंब, आणि सामाजिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्याने सर्वस्व सोडून संन्यासी जीवन स्वीकारले आहे.
वधू मिळत नसल्याने मुले तणावात
सध्या मुलाला मुलगी भेटणे अवघड झाले आहे. त्यासाठी आता वधू-वर मेळाव्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. परंतु तेथेही मुलांच्या वाटेला निराशाच पदरी पडते. त्यामुळे मुलांचे वय निघून जात आहेत. त्यामुळे आधीच अनेक तरुण तणावात असतानाच सिडको परिसरात घडलेल्या घटनेची चांगलीच चर्चा घडत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.