Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'नाराजी नको तत्काळ फ्लॅट ताब्यात घ्या', नाराज आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

'नाराजी नको तत्काळ फ्लॅट ताब्यात घ्या', नाराज आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश


महायुती सरकारमधील खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिपदाच्या शपथविधीला 17 दिवस उलटल्यानंतरही अद्याप 18 मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली आहे.

आवडीची खाती न मिळणे त्याशिवाय बंगला न आवडल्याने अनेकांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे.


अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना आदेश जारी केले आहेत. ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यांनी त्वरित पदभार स्वीकारा. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री यांनी बंगले आणि फ्लॅटवरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सीएम फडणवीस यांनी नाराजी नको तत्काळ फ्लॅट ही ताब्यात घ्यावे आणि कामाला सुरुवात करावी असा आदेश दिला आहे.

महायुतीतील डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनी आमदारांना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. अनेक आमदारांना दिलेले फ्लॅट आणि बंगले पसंत पडलेले नाहीत. मात्र आता देण्यात आलेल्या फ्लॅट आणि बंगल्यात राहा. येत्या वर्षात काही मंत्र्यांना नव्या जागी मोठे फ्लॅट देण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे.

या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही:

शिवेंद्रसिंह राजे भोसले
गुलाबराव पाटील
दादा भूसे
उदय सामंत
अतुल सावे
शंभुराज देसाई
आशिष शेलार
दत्तात्रय भरणे
जयकुमार रावल
माणिकराव कोकाटे
संजय सावकारे
नरहरी झिरवाळ
भरत गोगावले
गुलाबराव पाटील
दादा भूसे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.