Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जबरदस्ती लग्न लावल्याचे सांगत १४ दिवसांतच गाठले माहेर

जबरदस्ती लग्न लावल्याचे सांगत १४ दिवसांतच गाठले माहेर
 

पुणे, : 'घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिले आहे. मला तुमच्या सोबत लग्न करायचे नव्हते. त्यामुळे माझी बहीण ज्याप्रमाणे तिच्या सासू सासऱ्यांना त्रास देते, तसाच त्रास मी तुमच्या आई-वडिलांना देणार,' असे म्हणन महिलेने लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच पतीला त्रास देण्यास सुरुवात केला. तसेच पतीचे केस ओढत त्यांना नखे देखील मारली व पत्नी लग्नानंतर १४ दिवसांतच माहेरी गेली. त्यातून झालेल्या वादातून हे जोडपे लग्न झाल्यानंतर वर्षभरातच कायमचे विभक्त झाले आहेत.

 

लग्नानंतर पत्नीने दिलेल्या त्रासामुळे पतीने कुरतेच्या आधारे पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अॅड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत येथील कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर दोघांनी काही अटींवर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी हा दावा निकाली काढला.

या प्रकरणातील ३० वर्षीय अशोक आणि २४ वर्षीय अश्विनी (दोन्ही नावे काल्पनिक) यांचे ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी अश्विनी यांनी पतीचे केस ओढून त्यांना नखे मारण्यास सुरुवात केली आणि २० डिसेंबर रोजी माहेर गाठले. पत्नी नांदण्यासाठी येत नसल्याने अशोक यांनी १९ एप्रिल २०२४रोजी घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी २१ डिसेंबरला संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांनाही पुन्हा एकत्र येणे शक्य नव्हते. तसेच विभक्त कसे व्हायचे या बाबतच्या अटी ठरलेल्या आहेत. दोघांचे वय कमी आहे. त्यामुळे पुढील आयुष्याचा विचार करता "कूलिंग ऑफ पीरियड' वगळण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. न्यायालयाने तो मान्य करत दावा त्वरित निकाली काढला.
तुला मारण्यासाठीच नखे वाढवली आहेत

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीच्या कृत्याने हादरलेल्या अशोक यांनी पत्नीला या प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावर आश्विनीने त्यांना सांगितले की, "मला तुमच्यासोबत काय कोणाशीच लग्न करायचे नव्हते. माझ्या घरच्यांनी जबरदस्ती माझे लग्न लावून दिले आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्रास देणार. त्यासाठीच मी नखे वाढवली असून त्यांनी तुला मारणार,' असे म्हणत तिने पतीवर हल्ला केला.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.