निलंबन झालेला तो पोलीसही वाल्मिक कराडसोबत, सर्वात मोठा पुरावा समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video) समोर आले आहे.
29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती मिळतीये. वाल्मिक कराड (Walmik Karad) हा आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले तसेच त्यांच्या इतर साथीदारांना भेटायला आला होता. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले.
वाल्मिक कराड केजमध्ये का गेला होता?
केज शहरात आरोपी विष्णू चाटे ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आला होता, त्यावेळचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये केजचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील वाल्मिक कराडसोबत असल्याचं उघड झालं आहे. आवादाकडे ज्या दिवशी खंडणी मागितली होती, त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वाल्मिक कराड केजमध्ये का गेला होता? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
निलंबित अधिकारी राजेश पाटील आरोपीसोबत
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले प्रमुख आरोपी आहेत, अशातच वाल्मिक कराड तिथं काय करत होता? असा सवाल विचारला जात आहे. ज्यावेळी आवादा कंपनीमध्ये मारामारी झाली होती, त्यानंतर एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये आरोपीसोबत दिसले होते. त्यानंतर आता राजेश पाटील पुन्हा आरोपीसोबत दिसून आले.
राजेश पाटील यांची चौकशी होणार?
आता निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची देखील चौकशी होणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पाटील आरोपीसोबत जाताना आणि येताना देखील दिसत आहेत.
दरम्यान, केजचे निलंबत पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघे हत्येची घटना होण्यापूर्वी केज शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं होतं. पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगनमतानेच या हत्येचा कट रचला गेला का, असाही सवाल विचारला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.