'माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते', एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर
एल अँड टीचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यम यांनी आठवड्यातील 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोल होत आहेत. सुब्रमण्यम यांच्या या सल्ल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आता महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देखील या चर्चेत सहभाग घेतला आहे. कामाच्या प्रमाणावर नाही त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, कारण जग 10 तासात बदलू शकते, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे. दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवाला संबोधित करताना महिंद्रा बोलत होते.
सोशल मीडियावर वाद सुरूच
एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. "तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता," असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच आठवठ्यात 90 तास काम केले पाहिजे, कर्मचाऱ्यांनी रविवारीही सुट्टी घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला होता. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्याबाबत आनंद महिंद्रा यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती आणि इतरांबद्दल आदर व्यक्त केला आणि म्हणाले, "मला चूक करायची नाही पण मला काहीतरी सांगायचे आहे. मला वाटतं ही चर्चा चुकीच्या दिशेने जात आहे कारण ही चर्चा कामाच्या प्रमाणाबाबत आहे."काय म्हणाले महिंद्रा?
माझे म्हणणे आहे की, आपण कामाच्या प्रमाणावर नव्हे तर कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा 40 तास, 70 तास किंवा 90 तासांचा प्रश्न नाही. तुम्हाला कोणते परिणाम मिळत आहेत? भलेही ते 10 तास असले तरी, तुम्ही 10 तासांत जग बदलू शकता. तुमच्या कंपनीत असे लोक असले पाहिजेत जे हुशारीने निर्णय घेतील असे मी मानतो, असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.