सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.इंडियन ऑइलमध्ये सध्या भरती सुरु आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. iocl.com या वेबसाइटवर या नोकरीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. इंडियन ऑइलमध्ये तब्बल २०० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत. इंडियन ऑइलमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ५५ जागा रिक्त आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी २५ जागा तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १२० जागा रिक्त आहेत.
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन केलेले असावे.अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ असावे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केलेली असावी. यानंतर मेडिकल फिटनेस टेस्ट केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने NAPSNATS या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.