Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे तेथे काय उणे..! केवळ १ रुपयात ड्रेसची जाहिरात दुकानदाराच्या अंगलट; आक्रमक महिलांनी स्टॅच्यूवरचे कपडेही काढून नेले!

पुणे तेथे काय उणे..! केवळ १ रुपयात ड्रेसची जाहिरात दुकानदाराच्या अंगलट; आक्रमक महिलांनी स्टॅच्यूवरचे कपडेही काढून नेले!
 

पुणेरी पाट्या जशा प्रसिद्ध आहेत तसेच अभिनव जाहिराती प्रसिद्ध करून पुणेकर मार्केटिंगचा नवा फंडा बाजारात आणत आहेत.आज प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एका दुकानदाराने मार्केटिंगचा फंडा म्हणून केवळ एक रुपयात ड्रेस घेऊन जा, अशी जाहिरात केली.

याचे शहरभर पॉम्पलेटही वाटले.याचा परिणाम असा झाला की, आज सकाळपासूनच १ रुपयात ड्रेस खरेदी करण्यासाठी दुकानासमोर महिलांची झुंबड उडाली. महिलांची गर्दी पाहून दुकानदाराला धडकी भरली व त्याने दुकान बंद करून पलायन केले. ड्रेस मिळत नसल्याचे पाहून पुणेकर महिलाही संतप्त झाल्या त्यांनी दुकान फोडण्याची धमकी तर दिलीच पण बाहेर पुतळ्यांना घातलेले कपडेही काढून नेले. परिस्थिती हाताबाहेर जात असलेली पाहून पोलिसांना पाचारण केले गेले व स्थिती नियंत्रणात आणली.

होलसेल खरेदीसाठी अन्य शहरातून लोक पुण्यात येत असतात. अनेक दुकानदार पुण्यातून घाऊक खरेदी करून अन्य खेड्यापाड्यात विक्रीचा व्यवसायही करतात. अनेक दुकानदार आपली विक्री वाढवण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या योजत असतात. आज २६ जानेवारी निमित्तही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह कपड्याच्या दुकानांतही अनेक ऑफर्संचे बोर्ड झळकले.
दरम्यान, पुण्यातील राजगुरुनगर येथे केवळ १ रुपयांत महिलांच्या ड्रेसची जाहिरात विशेष चर्चेत होती. ही ऑफरमुळे दुकानासमोर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली व दुकानादारावर चक्क दुकान बंद करण्याची वेळ आली. त्यामध्ये, महिलांची संख्या लक्षणीय होती. गर्दी आटोक्यात न आल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

त्याचे झाले असे की, राजगुरूनगर भागातील एका होलसेल साडी दुकानदाराने दुकानाची जाहिरात करण्याच्या उद्देश्याने प्रजासत्ताक दिनानिमित्त एक अनोखी य़ोजना घोषित केली. दुपारी तीन ते ६ दरम्यान एक रुपयात ड्रेस देण्याची ऑफर जाहीर केली. या ऑफरअंतर्गत वाटण्यासाठी काही मर्यादित संख्यने ड्रेसही आणले होते. मात्र सोशल मीडिया व माऊथ पब्लिसिटीच्या माध्यमातून ही ऑफर शहरभर पसरली होती. एक रुपयात ड्रेस मिळणार या अपेक्षेने दुकानदाराच्या अपेक्षाहून कितीतरी पटीने अधिक महिलांनी दुकानात गर्दी केली.

महिलांची झुंबड पाहून दुकानदाराला धडकी भरली. दुकानदाराने काही ड्रेस एक रुपयात दिलेही मात्र त्यानंतर गर्दी वाढताना त्याने दुकानच बंद केले. १ रुपयामध्ये कपडे घेण्याच्या अपेक्षेने आलेल्या महिलांनी दुकान बंद होताच संताप व्यक्त केला. दुकान उघडत नाही हे पाहून महिलांनी राजगुरुनगर आणि भीमाशंकर मार्ग रोखून धरला. त्यामुळे येथे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं.
महिलांनी अक्षरशः दुकानाच्या बाहेर असणाऱ्या स्टॅच्यूवरील सॅम्पलचे कपडेही काढून घेतले. अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. रस्त्यावर झालेली महिलांची गर्दी व महिलांना रस्ता अडवल्याचे कळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेरीस संध्याकाळी काही प्रमाणात गर्दी कमी झाली. अनेक महिला १ रुपयांमध्ये ड्रेस न घेताच माघारी परतल्या. महिला माघारी परतल्यानंतर दुकानदाराने सुटकेचा निश्वास टाकला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.