वनविभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपये, पात्रता काय? अर्ज कसा करावा?
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महाराष्ट्र वनविभागाचे अधिनस्त ११ वनपरिक्षेत्रामध्ये ही भरती करण्यात येणार आहे.
वन्यप्राण्यांसाठी तातडीने सेवा उपलब्ध करण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्र वनविभागाद्वारे या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. वनविभागात चांगल्या पदावर नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
वनविभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून भरती सुरु आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी Bachlor Of Veterinary Science/ B.V.Sc पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत उमेदवार हा शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवाराला ५०,००० रुपये पगार दिला जाणार आहे.
वनविभागातील या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची भरती कोल्हापूर येथे होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे.पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला त्याच्यावर सोपवलेले काम करणे गरजेचे आहे.
या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कार्यालय, वनवर्धन इमारत, ग्राउंड फ्लोर, पोस्ट ऑफिसर समोर, ताराबाई पार्क येथे पाठवायचा आहे.
महिला व बालविकास भरती
सध्या महिला व बालविकास विभागात भरती सुरु आहे. महिला व बाल विकास संरक्षण हक्क आयोगात ही भरती केली जाणार आहे. अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२५ आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.