दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेत निघाली मेगाभरती, कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती?
दहावी पास तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील एका बड्या महानगरपालिकेत दहावी पास उमेदवारांसाठी एक मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत ही पदभरती निघाली असून यासाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
ज्या तरुणांना राजधानी मुंबईत काम करायचे असेल त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. तसेच यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज ही मागवले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेत पुरुष व महिला होमगार्डच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
त्यामुळे जर तुम्ही या पदभरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर तुम्हालाही अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान आता आपण या पदभरतीची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
मुंबई महानगरपालिकेत पुरुष आणि महिला होमगार्डच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती
या पदभरती अंतर्गत 2771 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महिला आणि पुरुष दोघांच्या रिक्त जागांचा यामध्ये समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता अन वयोमर्यादा
होमगार्ड साठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. या पदासाठी 20 ते 50 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार अशी माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
शारीरिक पात्रता
पुरुष उमेदवाराची उंची ही १६२ सेमी अन महिला उमेदवाराची उंची १५० सेमी गरजेची आहे. छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी गरजेची असते.
अर्ज कसा करायचा आहे?
अधिसूचनेत नमूद केलेल्या माहितीनुसार या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज हा विहित मुदतीत सादर करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यानंतर मात्र उमेदवाराकडून कोणत्याही सबबीवर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद संबंधित उमेदवारांनी घ्यायची आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.