Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बराक- मिशेल ओबामा यांचा घटस्फोट? ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत खळबळ

बराक - मिशेल ओबामा यांचा घटस्फोट? ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत खळबळ
 

अमेरिकेमध्ये सुरू असणाऱ्या घडामोडी सातत्यानं साऱ्या जगाचं लक्ष वेधताना दिसत आहेत. पण, सध्या फक्त राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याच्या प्रतिक्षेत असणारे ट्रम्पच नव्हे, तर माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेसुद्धा या चर्चांचा विषय ठरत आहेत.

यामागचं कारण मात्र फारच अनपेक्षित आणि अमेरिकेत खळबळ माजवणारं आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. एकिकडे 20 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांच्या वैवाहिक नात्यात काही गोष्टी बिनसल्याचं लक्षात येत आहे. किंबहुना त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनीसुद्धा जोर धरला आहे. 

का सुरु आहेत घटस्फोटाच्या चर्चा?
बराक आणि मिशेल ओबामा यांच्या कार्यालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकातून दिलेल्या माहितीनुसार माजी राष्ट्राध्यक्ष या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसून, सोबतच मिशेल ओबामासुद्धा या शपथविधीसाठी उपस्थित राहणार नाहीयेत. जवळपास 2 पर्वांमध्ये अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून वावरणाऱ्या मिशेल ओबामा सध्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी येणार नसल्यामुळं आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. 
का होता आहेत इतक्या चर्चा? 

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीसाठी माजी राष्ट्राध्यक्ष यांनी सपत्नीक पोहोचणं हा परंपरेचाच एक भाग आहे. असं असतानाही मिशेल ओबामा यांची अनुपस्थिती अनेक चर्चांना वाचा फोडत आहे. यापूर्वी कार्टर यांच्या अंत्यविधीवेळीसुद्धा मिशेल ओबामा त्यांच्या पतीसमवेत पोहोचल्या नव्हत्या. एकाच महिन्यात जवळपास 2 महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचं पतीसोबत न पोहोचणं कैक चर्चांना वाव देऊन गेलं. पण, अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. 

सर्वात प्रभावी जोडी...
जागतिक स्तरावर बराक आणि मिशेल ओबामा या जोडीला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. अमेरिकेचे प्रथम नागरिक होण्याचा मान असो किंवा पदमुक्त झाल्यानंतर विविध सामाजिक कार्यांपासून इतरही अनेक उपक्रमांमध्ये त्यांचाय उ्लेखनीय सहभाग असो, ओबाना यांनी कायमच अनेकांपुढं आदर्श प्रस्थापित केला आहे. तेव्हा आता या जोडीच्या नात्याचं भविष्य नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.