जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात आयकरचा छापा
जळगाव येथील शासकीय महाविद्यालयातून मोठी बातमी समोर आली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. नाशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपास पथक सकाळी 10 वाजता महाविद्यालयात दाखल झाले.
या कारवाईमुळे महाविद्यालयात खळबळ उडाली आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या दालनात पथकाने विविध बाबींची चौकशी केली. तब्बल 9 तास पथकाने ही चौकशी केली. चिंचोली मेडिकल हब मध्ये शासनाने दिलेल्या बाराशे कोटी वरील टीडीएस चुकवल्याच्या संशयाने इन्कम टॅक्स पथक शासकीय महाविद्यालयात दाखल झाले. उशिरापर्यंत त्यांची तपासणी सुरू होती. टीडीएस कापला गेला की नाही हे पाहण्यासाठी ही रुटींग तपासणी आहे असे शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी सांगितले.
शासनाने जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे मेडिकल हब निर्माण करण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामध्ये टीडीएस न कपातीच्या संशयाने सुमोटोने इन्कम टॅक्स चे पथक 21 जानेवारीला सकाळी दहा वाजेपासून शासकीय महाविद्यालय या ठिकाणी संपूर्ण विभागातील कागदपत्रांची तपासणी करीत आहे. यामध्ये आयुर्वेदिक होमिओपॅथिक सर्व विभागांची तपासणी व कागदपत्रांचीही तपासणी करण्यात येत आहे.
या पथकामध्ये कमिशनर, असिस्टंट कमिशनर व इतर कर्मचारी असे सात ते आठ जणांचा समावेश असून त्याबरोबर पोलीस पथकेही सकाळपासून ठाण मांडून बसलेली आहेत . टीडीएस मध्ये कोणत्या वस्तूंसाठी दहा टक्के, कुठे दोन टक्के असे टीडीएसची कपात करण्यात येते त्यानुसार सर्व कागदपत्र व सर्व विभागांचे लेखाजोखा तपासण्यात येत आहेत. याबाबत शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी माहिती दिली की, एचएससीसी व डीएमईआर वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग यांच्यामध्ये करार झालेला आहे. यामध्ये झालेल्या करारानुसार जी पेमेंट केली जाते त्यामध्ये टीडीएस कपात झालेला आहे की नाही मग तो योग्य प्रमाणात झालेला आहे की नाही याच्या तपासणीसाठी हे पथक आलेले आहे. त्यांना चिंचोली मेडिकल हब बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की संपूर्ण विभागाच्या चौकशी करण्यात येत आहेत. तिथे ठेकेदार वगैरे यांचा काही एक संबंध नाही शासनाकडून जो पैसा दिलेला आहे किंवा जी पेमेंट करण्यात येते त्यासाठी टीडीएस भरला आहे की नाही याची तपासणी करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.