कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व सिलेक्टर अजित आगरकर यांची बीसीसआय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीनंतर इंग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची यादी समोर आली आहे. या संघात १४ महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीला ट्वेंटी-२० संधी देण्यात आली आहे. तर विकेटकीपर ऋषभ पंतला संघातून वगळण्यात आले आहे.
मोहम्मद शमी वन-डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे शमीला मैदानाबाहेर राहावे लागले होते. मागच्या २, ३ महिन्यांपसून भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी शमी प्रयत्न करत होता. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत शमी पुनरागमन करण्याची शक्यता होती. परंतु आता इंडियन्स एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार इग्लंडविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी मोहम्मद शमीची संघात निवड करण्यात आली आहे.
विकेटकीपर ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्याजागी विकेटकीपर फलंदाज ध्रुव जूरेलला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर हर्षित राणा,रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजांना संघात संधी मिळाली आहे. संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर
भारतविरूद्ध इंग्लंड ट्वेटी-२० मालिका वेळापत्रक
२२ जानोवारी : पहिला सामना, (इडन गार्डन, कोलकाता), संध्याकाळी ७.०० वाजता२५ जानेवारी : दुसरा सामना, (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई), संध्याकाळी ७.०० वाजता२८ जानेवारी : तिसरा सामना, (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट) संध्याकाळी ७.०० वाजता३१ जानेवारी : चौथा सामना, (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे), संध्याकाळी ७.०० वाजता२ फेब्रुवारी : पाचवा सामना, (वानखेडे स्टेडियम, मुंबई), संध्याकाळी ७.०० वाजता
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.