कोल्हापूर : सोमवार पेठ परिसरातील ज्येष्ठ पत्रकार दिलावरखान ऊर्फ नाना आयुबखान मुन्शी पालकर (वय ७८) यांचे निधन झाले. शनिवारी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मुन्शी पालकर पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत होते. १९८८ ते १९९० मध्ये नवी दिल्ली येथे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. 'नानदास वटाणे' या टोपण नावाने त्यांनी दै. 'पुढारी'मध्ये वात्रटिका लेखन केले. १९९५ ते २००७ मध्ये त्यांनी तुलनात्मक वृत्त विश्लेषण व मुक्त पत्रकार म्हणून दै. 'पुढारी' मध्ये काम केले आहे. दै. 'पुढारी'साठी नवी दिल्ली, मुंबई प्रतिनिधी व विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.